एमएमआर होणार वेगवान!, रस्ते प्रकल्पांसाठी ३० हजार ८१८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:34 AM2017-12-25T04:34:57+5:302017-12-25T04:35:05+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांएवढेच लक्ष रस्ते वाहतूक प्रकल्पांवर दिले असून, एमएमआरडीएच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

MMR will be faster, road projects 30 thousand 818 crore | एमएमआर होणार वेगवान!, रस्ते प्रकल्पांसाठी ३० हजार ८१८ कोटी

एमएमआर होणार वेगवान!, रस्ते प्रकल्पांसाठी ३० हजार ८१८ कोटी

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांएवढेच लक्ष रस्ते वाहतूक प्रकल्पांवर दिले असून, एमएमआरडीएच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि बहुउद्देशीय विरार-अलिबाग या प्रकल्पांना नव्या वर्षांत अधिक गती मिळणार आहे. साहजिकच, यामुळे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अधिक वेगवान होणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची किंमत १७ हजार ८४३ कोटी आणि बहुउद्देशीय विरार-अलिबाग प्रकल्पाची किंमत १२ हजार ९७५ कोटी आहे. दोन्ही मिळून या प्रकल्पांची एकूण किंमत ३० हजार ८१८ कोटी असून, हे दोन्ही प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर मुंबईकरांसह मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठीच्या वाहतूक सेवा-सुविधांमध्ये भरच पडणार आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई पारबंदर प्रकल्प (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, एमटीएचएल) हाती घेण्यात आला आहे. २२ किलोमीटरचा हा मार्ग आहे. या प्रकल्पाची किंमत १७ हजार ८४३ कोटी आहे. शिवडी ते न्हावा असा हा सागरी सेतू असणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबई येथे उभ्या राहणाºया आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे थेट जाता येईल. पुणे एक्स्प्रेस वे आणि पुढे दक्षिण भारताकडे जाण्यासाठी हा मार्ग सोइस्कर ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाकरिता जायक आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा ७ हजार ९१० कोटींचा करार झाला आहे. प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी झाली आहे.
पूर्व अर्हतामान्य निविदाकारांकडून निविदा प्राप्त झाल्या असून, मूल्यांकनानंतर संबंधितांना स्वीकृती पत्र दिले आहे. या निविदाकारांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी एल अँड टी-आयएचआय, दुसºया टप्प्यासाठी टाटा-देवू आणि तिसºया टप्प्यासाठी एल अँड टीचा समावेश आहे.
 

Web Title: MMR will be faster, road projects 30 thousand 818 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.