मुंबई : अनेक कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यात डाटा सेंटर मोठ्या प्रमाणात आहेत. भविष्यात मोठया प्रमाणात इलेक्ट्रीक वेहीकल स्टेशन (ईव्हीएस) येतील. अशावेळी विजेचा पुरवठा अत्यंत आवश्यक आहे. डेटा सेंटर व ईव्हीएस सेंटर एकत्र आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. ऊर्जेच्या क्षेत्रात मुंबई महानगर विभागाला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प देखील यांनी राऊत यावेळी व्यक्त केला.१२ ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी राऊत यांनी गोरेगाव येथील अदानी इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आज मुंबई व एमएमआर क्षेत्रात ४ कोटी ६४ लाख लोकसंख्या असून १ कोटी २ लाख वीजजोडण्या आहेत. मोठी लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला आवश्यक असणारी विजेची गरज पाहता वीज कंपन्यांना भेटी देऊन माहिती संकलित करीत आहे, असेही ते म्हणाले.