एमएमआरसीचे प्रकल्प सोशल मीडियावरही सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:19 AM2019-12-31T01:19:29+5:302019-12-31T01:19:44+5:30

सोशल मीडियाद्वारे नागरिकांना प्रकल्पासंदर्भातील हरकती आणि सूचना प्रशासनापर्यंत पोहोचवणे सोपे झाले आहे.

The MMRC project is also up on social media | एमएमआरसीचे प्रकल्प सोशल मीडियावरही सुसाट

एमएमआरसीचे प्रकल्प सोशल मीडियावरही सुसाट

Next

- योगेश जंगम 

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) करण्यात येत आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला गती आली असून, या प्रकल्पाची सर्व माहिती वेळोवेळी एमएमआरसीच्या ‘मुंबई मेट्रो-३’ या ट्विटर हँडलवर उपलब्ध करण्यात येत असते. आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सोशल मीडियाद्वारे जलद आणि सत्य माहिती नागरिकांपर्यंत सहजपणे उपलब्ध होत आहे. सोशल मीडियाद्वारे नागरिकांना प्रकल्पासंदर्भातील हरकती आणि सूचना प्रशासनापर्यंत पोहोचवणे सोपे झाले आहे़ प्रशासनही यावर तत्काळ प्रतिसाद देत असल्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी झाले आहे.

मुंबईमध्ये जीवनवाहिनी असलेल्या लोकलला पर्याय ठरणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाला गती आली आहे. या मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम करण्यात येत असून, तब्बल ५५ किमी लांबीचे हे भुयारीकरण करण्यात येत आहे. या मार्गिकेचे काम भुयारीमार्गे करण्यात येत असल्याने हे काम किती झाले याबाबत मुंबईकरांना कमालीची उत्सुकता आहे. एममएमआरसीएलमार्फत प्रकल्पाबाबतची इत्थंभूत माहिती सध्या फेसबुक, वेबसाईट, टिष्ट्वटर आणि युट्यूब याद्वारे उपलब्ध करण्यात येते. यासाठी एमएमआरसीएलद्वारे एका स्वतंत्र टीमची नेमणूक केली आहे.

Web Title: The MMRC project is also up on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.