मुंबई - एमएमआरडीएला मुंबईमेट्रो मार्ग - २ अ या प्रकल्पासाठी सिसर क्रॉसओव्हर हे शनिवारी (२७ जून) मिळाले आहे. ये - जा करणाऱ्या ट्रेनला मार्ग बदलण्यासाठीची सिसर क्रॉसओव्हर ही एक विशिष्ट पद्धतीची मार्ग रचना असते. ही रचना चारकोप मेट्रो आगारकडे जाणाऱ्या उताराच्या भागात लावण्यात येणार आहे.
मेट्रो मार्ग - २ अ मध्ये सिसर क्रॉसओव्हर (एस.सी.ओ.) निश्चित केलेल्या जागी जुलै २०२० पर्यंत लावण्यात येईल. एस.सी.ओ. स्थापित करून झाल्यावर, बंगळरूवरून रस्त्यामार्गे आलेले व चारकोप आगारातील निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरवलेले मेट्रोचे डब्बे हे स्टॅबलिंग लाईनच्या मदतीने हलवले जातील. एस.सी.ओ. च्या मदतीने मेट्रो ट्रेन, स्टॅबलिंग लाईन, वर्कशॉप लाईन, तपासणी विभाग इत्यादी येते सुरळीतरित्या हलवता येतील.
सिसर क्रॉसओव्हरचे उत्पादन हे सोनिपत, हरियाणा येथे असलेल्या मे. व्ही.ए.इ.-व्ही.के.एन. या भारतीय कंपनीने केले आहे. एस.सी.ओ. च्या उत्पादनासाठी वापरले गेलेले विशिष्ट रूळ हे वोइस्टलपाईन या ऑस्ट्रेलियन कंपनीकडून आयात केले गेले असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात
Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण
CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण
घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं