तीन भूखंडातून एमएमआरडीएला दोन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:50 AM2019-06-26T02:50:58+5:302019-06-26T02:51:12+5:30

वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) येथील तीन भुखंड भाडेतत्वावर देण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठरवले आहे.

 MMRDA has more than two thousand crores of revenues from three plots | तीन भूखंडातून एमएमआरडीएला दोन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल

तीन भूखंडातून एमएमआरडीएला दोन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल

Next

मुंबई : वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) येथील तीन भुखंड भाडेतत्वावर देण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठरवले आहे. यातून प्राधिकरणाला दोन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळणार आहे. बीकेसीतील या भूखंडांचे क्षेत्रफळ सुमारे १२४०० चौरस मीटर असून यावर सुमारे ६ हजार ५०० चौरस मीटर बांधकाम केले आहे.
प्राधिकरणाने बीकेसीतील भुखंड भाडेतत्वावर देण्यासाठी निविदाही काढल्या आहेत. या निविदा प्रक्रियेला एका जपानी कंपनीने प्रतिसाद दिला आहे. प्राधिकरणाने बीकेसीतील जी ब्लॉक येथील ३ भूखंडा भाडे तत्वावर देण्यासाठी यापुर्वी निविदा मागवल्या. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही या भूखंडासाठी कोणीही पुढे आले नव्हते. एमएमआरडीएने २०१६ साली १२ हजार ५०० चौरस मीटर भूखंडाची विक्री केली होती. त्यातून १ हजार ५०० कोटी मिळाले होते. मात्र पहिल्याचवेळी भूखंडाची विक्री न झाल्याने अनेकदा निविदा काढल्या होत्या. यापूर्वी २००८ मध्येही विक्रीचा व्यवहार झाला होता. तेव्हा भूखंडाचे क्षेत्रफळ ३०० चौरस मीटर होते. २०१०मध्ये पुन्हा भूखंडविक्रीचा प्रयत्न झाला होता. प्रतिचौरस मीटरचा भाव साडेतीन लाखांवरून तीन लाखांवर आणला गेला. त्यानंतर आता जी ब्लॉकमधील तीन भूखंड भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढल्या आहेत.
 

Web Title:  MMRDA has more than two thousand crores of revenues from three plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.