मेट्रोला मिळणार ६,६०४ कोटींचे ‘बूस्ट’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:17 AM2022-02-25T10:17:14+5:302022-02-25T10:17:45+5:30

एमएमआरडीएने आपल्या मेट्रो प्रकल्पांवर तेवढेच लक्ष केंद्रित केले आहे.

mmrda Metro to get Rs 6604 crore boost for different projects concentrate on metro projects | मेट्रोला मिळणार ६,६०४ कोटींचे ‘बूस्ट’ 

मेट्रोला मिळणार ६,६०४ कोटींचे ‘बूस्ट’ 

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांसाठी निधी कमी पडत असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसीमधील आपल्या मालकीचे भूखंड लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच दुसरीकडे आता एमएमआरडीएने आपल्या मेट्रो प्रकल्पांवर तेवढेच लक्ष केंद्रित केले आहे. याकरिता प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी ६ हजार ६०४ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

येत्या सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरघोस रकमेची तरतूद करण्यात आली असली तरी प्रदेशात प्राधिकरणाचे महाकाय प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठीचा निधी प्राधिकरणाकडे अपुरा आहे. कर्जासह सरकारने यासाठी अर्थसाहाय्य करावे, याकडेही लक्ष वेधले जाणार आहे.

  • यंदाच्या अर्थसंकल्पात ७ हजार ६७९ कोटी ९३ लाखांची तूट येणार आहे.
  •  मेट्रो आणि उर्वरित विकासकामांसाठी १७ हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे.
  • येत्या पाच वर्षांत ४०००० कोटींचे कर्ज घेणार.
     

विविध मेट्रो प्रकल्प 
६ हजार ६०४ कोटी ६१ लाख
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 
३ हजार २७० कोटी
मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्प 
१ हजार ३९१ कोटी ४६ लाख
जलस्रोत विकास 
९५५ कोटी
वरळी ते शिवडी उन्नत मार्ग 
६०० कोटी
सांताक्रूझ - चेंबूर लिंक रोड 
२५१ कोटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक 
३०० कोटी
बाळासाहेब ठाकरे स्मारक 
२०० कोटी
बोरीवली ते ठाणे भुयारी मार्ग 
१५० कोटी
मोनो आणि भूसंपादन
१५६ कोटी ८६ लाख
बीकेसी सुधारणा 
१३८ कोटी ३६ लाख
मेट्रो ७, उन्नत पादचारी मार्ग अभियांत्रिकी आणि संरचना प्रकल्प व्यवस्थापनासह अंमलबजावणीकरिता 
१३५ कोटी ८५ लाख
वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे देखभाल 
११५ कोटी
वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो 
७४ कोटी
सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान पादचारी पूल 
 ६७ कोटी
एमएमआर बाह्य रस्ते व सुधारणा 
५९ कोटी
माथेरान रेल्वे 
२ कोटी

Web Title: mmrda Metro to get Rs 6604 crore boost for different projects concentrate on metro projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.