एमएमआरडीएने खेळणे हिरावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:29 AM2017-10-29T01:29:53+5:302017-10-29T01:29:56+5:30

कांजूरमार्ग येथील महर्षी कर्वे नगर या ठिकाणी एमएमआरडीएची नवीन वसाहत आहे. परिसरात बºयाच इमारती असून, येथील मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही.

MMRDA spun off play! | एमएमआरडीएने खेळणे हिरावले!

एमएमआरडीएने खेळणे हिरावले!

googlenewsNext

मुंबई : कांजूरमार्ग येथील महर्षी कर्वे नगर या ठिकाणी एमएमआरडीएची नवीन वसाहत आहे. परिसरात बºयाच इमारती असून, येथील मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही. मैदानासाठी अनेक पत्रव्यवहार करूनदेखील संबंधित प्राधिकरण लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
येथील परिसरात संक्रमण शिबिर, सातमजली, पंधरा, सतरा व बावीस माळ्यांचे टॉवर्स बांधण्यात आले आहेत. विभागातील लोकसंस्था वाढत असून, मुलांना खेळण्याकरिता मैदान नाही. येथे पार्किंगची सुविधा नाही. शिवाय आपत्ती काळात कोणत्याही प्रकारची सेवा पोहोचणे येथे कठीण आहे, असे महर्षी कर्वे नगरच्या रहिवाशांनी सांगितले.
विभागातील सर्वे नंबर १२०मध्ये ७ हजार चौरस फुटांच्या भूखंडाचा भाग खेळाच्या मैदानासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. नियोजित पी-४ या इमारतीचा काही आरक्षित भूखंड एका सरकारी वीज कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. हा भूखंड मोकळा करून तो खेळाच्या मैदानासाठी देण्यात यावा, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान, खेळाच्या मैदानाबाबत मॅरेथॉन रहिवासी असोसिएशनने पुढाकार घेत आमदार सुनील
राऊत यांची भेट घेतली. याच
काळात संबंधित प्रशासनाने खेळाच्या मैदानाबाबत आश्वासन दिले. मात्र आश्वासनाची पूर्तता कधी
होणार? याची वाट रहिवासी पाहत आहेत.

Web Title: MMRDA spun off play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.