Join us

निधी उभारणीसाठी एमएमआरडीएची जर्मन बँकेसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 3:40 AM

मुंबई आणि मुंबईलगतच्या भागामध्ये मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांसह अन्य पायाभूत सुविधा उभारत आहे.

मुंबई : मुंबई आणि मुंबईलगतच्या भागामध्ये मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांसह अन्य पायाभूत सुविधा उभारत आहे. या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता आहे. या निधीच्या उभारणीबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच जर्मन बँकेच्या प्रतिनिधींंसोबत एक बैठक पार पडली.जर्मन बँकेच्या प्रतिनिधींसमवेत पार पडलेल्या या बैठकीमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या प्रतिनिधींसोबत आगामी प्रकल्पांबाबत चर्चा केली. अधिकाºयांनी या प्रतिनिधींना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनही दिले.मुंबई आणि एमएमआरमध्ये कशा प्रकारे ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल, शिवडी ते न्हावा-शेवा या २२ किमी सागरी सेतूचे काम कसे केले जात आहे. मल्टिमॉडल कॉरिडॉर, इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टम आणि इतर प्रकल्प येत्या काळात कसे मुंबईचा चेहरामोहरा बदलतील याबाबत जर्मन बँकेच्या प्रतिनिधींना एमएमआरडीएने माहिती दिली.काही महिन्यांपूर्वीच आर्थिक व्यवहार विभाग आणि अर्थ मंत्रालयाने जर्मनीच्या केएफडब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेमार्फत मेट्रो-४ मार्गिकेच्या उभारणीसाठी निधी मंजूर केला होता. मेट्रोसोबत शहरात सुरू असलेल्या इतर कामांची माहिती देत असताना, पर्यावरणाच्या दृष्टीने एमएमआरडीए घेत असलेली विशेष काळजी आणि सामाजिक जबाबदारी यांची माहिती बँकेच्या पदाधिकाºयांना देण्यात आली.एमएमआरडीए बहुसंख्य प्रकल्प हे खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर न राबवता केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीच्या साहाय्याने राबवणार आहे. एमएमआरडीएचा निधीही यामध्ये असणार आहे.

टॅग्स :एमएमआरडीएमुंबई