मुंबई : मान्सून सुरू होण्यासाठी आता कमी दिवस शिल्लक असल्याने पश्चिम आणि पूर्व दृतगती महामार्गांवरील खड्डे बुजवण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. हे खड्डे भरण्यासाठी एमएमआरडीए ४ कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च करणार असून कंत्राटदारांच्या नेमणुकीसाठी निविदाही मागविल्या आहेत.
येत्या १५ ते २० दिवसांत मुंबईमध्ये मान्सून पोहोचणार आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व दृतगती महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएमआरडीएने आॅनलाइन निविदा जाहीर केल्या असून कंत्राटदाराला ३ जूनपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे कामे लवकर सुरू होतील.
महामार्गाची अधिक चिंता
एमएमआरडीएला सायन ते ठाण्यापर्यंत पसरलेल्या पूर्व दृतगती महामार्गावर जास्त खड्डे होण्याची चिंता वाटत आहे. यामुळे ४ कोटी ८४ लाख रुपयांच्या खर्चापैकी ४ कोटी २४ लाख २१ हजार २६५ रुपये पूर्व दृतगती महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. तर पश्चिम दृतगती महामार्गावर होणारे खड्डे भरण्यासाठी फक्त ६० लाख ४४ हजार ४५३ रुपयांचा खर्च होणार आहे.
पाच भागांमध्ये विभाजन
च्पूर्व दृतगती महामार्ग २५ किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजविण्यासाठी संपूर्ण दृतगती महामार्गाला पाच भागांमध्ये विभाजित केले आहे. प्रत्येक भागात साडेचार ते पाच किलोमीटर लांबीचा रस्ता ठेवण्यात आला आहे.
च्प्रत्येक क्षेत्रातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी ७९ ते ९१ लाखांपर्यंत खर्च करण्याची योजना बनविण्यात आली आहे. पश्चिम आणि पूर्व दृतगती महामार्ग हे मुंबईचे दोन प्रमुख महामार्ग आहेत. पश्चिम दृतगती महामार्ग मुंबईला गुजरात, राजस्थानला जोडतो. तर पूर्व दृतगती महामार्ग मुंबईला कल्याण आणि नाशिकला जोडतो. च्या महामार्गांवर दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते.
मोठ्या संख्येच्या वाहनांमुळे या महामार्गांवर बहुतांश वेळेला वाहतूककोंडीही होते. पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना वाहने चालविण्यास कठीण होते. खड्ड्यांमुळे दृतगती महामार्गावर शेकडो अपघातही होतात. या अपघातांमुळे प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागतो. च्या महामार्गांच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.