Join us

आपत्कालीन संकटाशी दोन हात करणार एमएमआरडीएचा नियंत्रण कक्ष; मोनोरेलवरही नजर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाणी साचणे, मुसळधार पाऊस आणि इतर समस्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी एमएमआरडीएच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पाणी साचणे, मुसळधार पाऊस आणि इतर समस्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ताे १ ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहील. मान्सून संबंधित तक्रारी दूर करणे, त्यांचा पाठपुरावा करणे, समन्वय साधणे तसेच राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इतर आपत्ती नियंत्रण संस्थांशी संवाद साधण्याचे प्राथमिक काम नियंत्रण कक्षाद्वारे करण्यात येईल.

कंट्रोल रूमचे कर्मचारी तीन शिफ्टसाठी काम करतील. पाणी साचणे, अपघात, खड्डे आणि पडणारी झाडे, अशा समस्या साेडवण्यासाठी मुंबईकर या कक्षाशी संपर्क साधू शकतात. एमएमआरडीएच्या वतीने अनेक ठिकाणी चालू असलेल्या प्रकल्पातील पादचारी व वाहनचालकांची गैरसोय टाळणे हे नियंत्रण कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. एमएमआरडीएचे अधिकारी विविध ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहावर देखरेख ठेवतील. कंत्राटदारांना सर्व सुरक्षा उपायांचे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत.

महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी जलपंप बसविण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले आहेत. वडाळा आगारातील केंद्रीय नियंत्रण कक्षापासून स्वतंत्रपणे मुंबई मोनोरेलवरही नजर ठेवली जाणार आहे.

----------------------------------------------------------------------