फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक
By admin | Published: July 22, 2014 01:12 AM2014-07-22T01:12:23+5:302014-07-22T01:12:23+5:30
विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर मनसेने पुन्हा एकदा परप्रांतिय मुद्दावर उडी मारली आह़े फेरिवाले वाढल्याने मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आह़े
Next
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर मनसेने पुन्हा एकदा परप्रांतिय मुद्दावर उडी मारली आह़े फेरिवाले वाढल्याने मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आह़े त्यामुळे पालिकेने सुरु केलेले फेरिवाल्यांचे सव्रेक्षण थांबवा, अन्यथा अधिका:यांना कोंडण्याची तंबीच आयुक्त सीताराम कुंटे यांना मनसेने आज दिली़
परप्रांतियांच्या विरोधात मनसेने यापूर्वीच दंड थोपटले होत़े परंतु कालांतराने हा विषय मागे पडला आणि लोकसभा निवडणुकीत मनसेला चापराक बसली़ त्यामुळे मनसेने पुन्हा फेरिवाल्यांच्या निमित्ताने परप्रांतियांचा मुद्दा उकरला आह़े मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची पालिका मुख्यालयात आज भेट घेतली़ फेरिवाला धोरण अंमलबजावणीस पालिकेने हाती घेतलेले सव्रेक्षण सुरु केल्यापासून फेरिवाले वाढू लागले आहेत़ हे सव्रेक्षण नगरसेवकांना विश्वासात न घेताच सुरु केल्याने ही प्रक्रिया रद्द करुन 8क् टक्के भूमिपुत्रंना फेरीचा परवाना देण्याबाबत धोरण निश्चित करावे, अशी ताकीद देत मनसेने स्टाईलने कारवाईचा इशाराही दिला आह़े (प्रतिनिधी)
च्मुंबईत परवानाधारक फेरिवाल्यांची संख्या 15 हजार आह़े मात्र बेकायदा फेरिचा व्यवसाय करणारे तीन ते चार लाखांच्या आसपास आहेत़
च्शहराच्या लोकसंख्येच्या अडीच टक्के फेरिवाल्यांना फेरीचा धंदा करण्याची अनुमती देण्याचा विचार केंद्रिय स्तरावर सुरु होता़