सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून शिवाजी पार्कात मनसेचे आंदोलन; पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 10:17 AM2022-02-23T10:17:44+5:302022-02-23T13:56:14+5:30

भविष्यात या मड ट्रॅकचा रस्ता म्हणून वापर करू शकतात त्यामुळे मैदानात पावित्र्य घालवू नका, अशी मुख्य मागणी मनसेची आहे.

MNS agitation in Shivaji Park on the issue of beautification; Police took him into custody | सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून शिवाजी पार्कात मनसेचे आंदोलन; पोलिसांनी घेतलं ताब्यात

सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून शिवाजी पार्कात मनसेचे आंदोलन; पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध अशा शिवाजी पार्क मैदानात महानगरपालिकेने खडी टाकल्याने मनसेने सकाळपासूनच धरणे आंदोलन सुरू केले आहे. माजी आमदार नितीन सरदेसाई व मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. मैदानात खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याने मनसे व शिवाजी पार्क च्या परिसरातील नागरिकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर पोलिसांनी नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांना ताब्यात घेतले.

पार्कात खडी टाकू नका मनसेची मागणी
शिवाजी पार्क हे खेळाचं व व्यायामाच मैदान आहे. इथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण खेळत असतात व सकाळी संध्याकाळी व्यायाम करत असतात. परंतु, पालिकेकडून पार्कात 'मड ट्रॅक'चे काम सुरू असल्याने त्यासाठी खडी टाकण्यात आली आहे. भविष्यात या मड ट्रॅकचा रस्ता म्हणून वापर करू शकतात त्यामुळे मैदानात पावित्र्य घालवू नका, अशी मुख्य मागणी मनसेची आहे.

Web Title: MNS agitation in Shivaji Park on the issue of beautification; Police took him into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.