"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:10 PM2020-09-04T16:10:02+5:302020-09-04T16:15:55+5:30
मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे.
मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे.
अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंबंधी एक पत्र पाठवलं आहे. तसेच मनसेनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. "गेल्या सहा महिन्यांच्या कोरोना लॉकडाउनच्या कालावधीत क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबरच प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो."
गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यासारख्या नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी; मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra@Central_Railway@WesternRlypic.twitter.com/XfSOESnfSx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 4, 2020
"सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास परवडत नाही. या खर्चामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकांची गरज असते. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास परवडणं शक्य नसल्याने त्यांना रेल्वेने प्रवासासाठी मुभा देणे गरजेचे आहे. गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिली जावी, या मनसेच्या आग्रही मागणीचा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीने विचार करावा" असं पत्रात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
विकृतीचा कळस! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, 20 दिवसांतील तिसरी घटना
बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ
Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी
रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू