Join us

महिलेस मारहाणीबद्दल मनसेची दिलगिरी, पदाधिकाऱ्याची केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 9:10 AM

MNS News: बॅनर लावण्यावरून निर्माण झालेल्या वादात मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याबद्दल मनसेने दिलगिरी व्यक्त केली. तसेच मारहाण करणारे विनोद अरगिले यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मुंबई : बॅनर लावण्यावरून निर्माण झालेल्या वादात मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याबद्दल मनसेने दिलगिरी व्यक्त केली. तसेच मारहाण करणारे विनोद अरगिले यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. महिला व ज्येष्ठांचा आदर, सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, असा आदेश कार्यकर्त्यांनादेखील दिलेला असताना जी घटना घडली, त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करत आहे. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, विनोद अरगिले यांना पदमुक्त करण्यात येत आहे. भविष्यात या प्रकरणाची योग्य ती माहिती घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल व पुढील निर्णय घेण्यात येईल, असे नांदगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

कामाठीपुरा येथे १ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. गणेशभक्तांचे स्वागत करणारे बॅनर अरगिले यांनी लावले होते. या महिलेच्या दुकानासमोर बॅनर लावल्याने वाद झाला. त्यावेळी अरगिले याने संबंधित महिलेला मारहाण केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासंदर्भात या महिलेने अपशब्द वापरल्याने राग आला असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. 

किशोरी पेडणेकरही पीडितेच्या भेटीलाशिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी मारहाण झालेल्या महिलेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. विनोद अरगिले यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली. दरम्यान, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना टीकेची धनी बनली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. 

टॅग्स :मनसेमहाराष्ट्र