मनसे शाखाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

By admin | Published: November 23, 2014 01:19 AM2014-11-23T01:19:58+5:302014-11-23T01:19:58+5:30

भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला.

MNS attack | मनसे शाखाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

मनसे शाखाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Next
कल्याण : भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. यात त्यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींना 24 तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 
भोईर हे चिकणघर विभागाचे शाखाध्यक्ष असून त्यांच्या कार्यालयात काम करणारा मयूर केणो आणि विजय तेली या दोघांचे शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास किरकोळ भांडण झाल़े याची माहिती मिळताच भोईर यांनी दोघांनाही कार्यालयात बोलवून त्यांची समजूत घातली. या रागातून तेलीने आपल्या साथीदारांच्या मदतीने भोईर यांच्यासह स्वप्निल वर्पे आणि रतन केणो या तिघांवर धारदार शस्त्रने हल्ला चढविला. यात तिघे जण गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजय तेली, सचिन यादवडे, जय डोंगरे, निखिल देसले यांच्यासह अन्य 1क् ते 12  जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रय} आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. कारची मोडतोडही झाली आहे.
 
मनसेचा कल्याण 
बंदचा इशारा 
आरोपींना 24 तासांत अटक न झाल्यास कल्याण बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. अटकेच्या मागणीसाठी माजी आमदार प्रकाश भोईर, शहराध्यक्ष रवींद्र भोसले, सरचिटणीस इरफान शेख यांनी वरिष्ठ निरीक्षक दिनेश कटके यांना निवेदन दिल़े मनसेचे नेते बाळा नांदगावकर सोमवारी कल्याणमध्ये येऊन जखमींची भेट घेणार आहेत.

 

Web Title: MNS attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.