मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांना मारहाण

By admin | Published: February 24, 2017 12:25 AM2017-02-24T00:25:09+5:302017-02-24T00:25:18+5:30

मुंबई महानगरपालिकेतील निवडणूक निकालांना हाणामारीचे गालबोट लागले आहे

MNS candidate Sanjay Trude gets assault | मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांना मारहाण

मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांना मारहाण

Next

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 24 - मुंबई महानगरपालिकेतील निवडणूक निकालांना हाणामारीचे गालबोट लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कलिना प्रभाग क्र.166 येथील विजयी उमेदवार संजय तुरडे यांना मारहाण झाली आहे.  भाजपा पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी व भाजपाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांनी तुरडे यांच्यावर धारधार शस्त्रासह प्राणघातक हल्ला केला. हल्यात मनसेचे 10-12 कार्यकर्ते गंभीर जखमी. विजयी उमेदवार संजय तुरडेंची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना कुर्ला बैलबाजार येथील आगाशे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: MNS candidate Sanjay Trude gets assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.