Join us

'आमचा टिनू...'; राज ठाकरेंची लग्नपत्रिका अन् फोटो होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 2:35 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा फोटो आणि लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- मुकेश चव्हाण

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. त्यात त्यांची लव्ह स्टोरी ही त्यांच्यासारखीच हटके आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती. मात्र याचदरम्यान राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नातील एक फोटो आणि राज ठाकरेंची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

राज ठाकरेंच्या या लग्नपत्रिकेत नेमकं काय म्हटलं आहे, पाहा...

जय महाराष्ट्र,

आमचा टिनू हा हा म्हणता स्वरराज झाला नि राजा म्हणून लग्नाला उभा राहिला. मोहन वाघ नि पदमश्री वाघ यांची सुकन्या चि. शर्मिला हिने राजाला जिंकलं आणि ते लग्नाला तयार झाले. आता लग्नाचे लाडू घ्यायलाच हवे, पण त्याला मुहूर्तही हला, म्हणून आपण सर्वांनी मंगळवार दिनांक ११ डिसेंबर ९० रोजी वनिता समाज, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे येऊन या दोघांनाही मनापासून आशीर्वाद द्यावेत, ही आमची इच्छा, मात्र अहेर आणि पुष्पगुच्छ आणू नयेत. 

आपले नम्र,

बाळ केशव ठाकरेसौ. मीना बाळ ठाकरेश्रीकान्त केशव ठाकरेसौ. मधुवन्ती श्रीकान्त ठाकरे

दरम्यान, राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत किस्सा सांगितला होता. दोघांची ओळख कशी झाली याबाबत विचारलं असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "मी रुपारेल कॉलेजमधून पास झाल्यानंतर नोकरी करत होते. त्यावेळी रविवारी मित्रमैत्रीणी भेटतात तसे आम्ही भेटायला गेलो होतो. तेव्हा राज त्याच्या मित्रांसोबत रुपारेलमध्येच होता. त्यावेळी शिरीष पारकर त्याच्यासोबत होता. शिरीष पारकरने आमची ओळख करुन दिली होती. तो आमचा कॉमन फ्रेण्ड होता. तेव्हापासून हा माझ्या मागे होता. तो कितीही सांगेल की नाही पण तोच माझ्या मागे लागला होता." "त्यावेळी लॅण्डलाईनवर फोन करायचो, बोलायचो. आमचं लग्न लहान वयात झाल्याचंही शर्मिला ठाकरेंनी सांगितलं. 

घरात लग्नाला विरोध झाला नाही. बाळासाहेब, माझे वडील, आणि मोहन वाघ चांगले मित्र होते. बाळासाहेब अमेरिकेला गेले होते तेव्हा सगळ्यात महागडी गोष्ट कोणासाठी आणली असेल तर ती शर्मिलाच्या बाबांसाठी. बाळासाहेबांनी त्यांना हॅजलब्लेड कॅमेरा आणला होता. त्यामुळे त्यांची घट्ट मैत्री होती. मोहन वाघांमुळे बाळासाहेब आणि पप्पा हिला ओळखत होते. पण हिची आणि माझी ओळख असल्याचा प्रश्नच नव्हता, असं राज यांनी सांगितलं. "तर राजची बहिण माझी मैत्रीण होती. तिला भाऊ आहे हे देखील मला माहित नव्हतं," असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

टॅग्स :राज ठाकरेमनसेसोशल व्हायरल