Join us  

Raj Thackeray: कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:11 PM

​​​​​​​अयोध्या दौरा रद्द केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरेंना चौफेर टीका सहन करावी लागली.

कुजबुज-

१. कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?

अयोध्या दौरा रद्द केल्यामुळे मनसेप्रमुखराज ठाकरेंना चौफेर टीका सहन करावी लागली. साहेबांच्या या भूमिकेमुळे कट्टर महाराष्ट्र सैनिकांतही काहीशी नाराजी होती, कारण जो-तो येऊन या विषयावरुन चिमटे काढायचा. त्यावर 'अयोध्या दौऱ्याला विरोध, एक सापळा होता आणि त्यासाठी रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असे स्पष्टीकरण राज यांनी पुण्यातील सभेत दिले, असले तरी रसद पुरवण्याचे नाव न घेतल्याने, कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. 

एरवी एखाद्यावर शरसंधान साधताना साहेब पार खोलात जातात, त्याच्या नकलाही करतात. पण तोफ डागण्याची आयती संधी चालून आली असताना त्यांनी सुतळी बॉम्बवर निभावून नेले. 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' हे गुलदस्त्यात ठेवणे सिनेमाची गरज होती, पण रसद पुरवणाऱ्याचे नाव गुलदस्त्यात ठेवून राजसाहेबांनी पक्षाचेच नुकसान केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

२. दादांना झाले तरी काय?

एरवी नवी मुंबई शहरावर कोणतीही आपत्ती आली तरी रात्र किंवा दिवस न पाहता मदतीस धावून जाणारे नेतृत्व, गेली २५ वर्षे शहराचे सौंदर्य जपणारे नेतृत्व, शहरवासीयांवर गेली २५ वर्षे कोणतीही करवाढ न करताही येथील महापालिकेवर एकहाती सत्ता राखणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, 

सर्व पक्षांच्या श्रेष्ठींसह सर्वस्तरातील उद्योगपतींशी सोलख्याचे संबंध असणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. परंतु, अलीकडे त्यांनी शहरातील महत्वाच्या विषयांवर मौन बाळगल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे. एरवी दर आठवड्यात नवी मुंबई महापालिकेत आयुक्तांशी भेट देऊन विविध विषय मांडून ते सोडविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. परंतु, वाशी येथे ३९१ वृक्षांचा बळी देऊन सुमारे ४५० कोटी खर्चून होत असलेल्या उड्डाणपुलास नवी मुंबईकरांचा तीव्र विरोध असतानाही या नेतृत्वाने मौन बाळगले आहे. पुलाच्या बाजूने किंवा विरोधात अशी कोणतीही भूमिका त्यांनी घेतलेली नाही. यामुळे आमच्या दादांना झाले तरी काय, अशी कुजबुज त्यांचे चाहते करु लागले आहेत. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेअयोध्या