राज ठाकरेंच्या भाषणानंतर पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 10:45 AM2022-04-05T10:45:14+5:302022-04-05T10:45:19+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी कोणत्याही प्रार्थनेला विरोध केलेला नाही, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

MNS chief Raj Thackeray has not opposed any of the prayers, said MNS leader Sandeep Deshpande. | राज ठाकरेंच्या भाषणानंतर पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने दिली प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या भाषणानंतर पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने दिली प्रतिक्रिया

Next

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला आहे. मशीदवरील भोंगे पाहिजेत. अन्यथा त्यांच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. 

राज ठाकरेंच्या या विधानावरुन महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. तर राज्यात कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले आहेत. त्यातच पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने मनसे पक्षाला राजीनामा दिल्याचे पत्र नगरसेवक वसंत मोरे यांना पाठवले आहे. यावर पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजीनाम्यासंबंधी बोलताना सांगितले की, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे. आमचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. काही लोक गैसमज करुन देतात त्यातून हे झालं असावं. पण यातून मार्ग निघेल, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी कोणत्याही प्रार्थनेला विरोध केलेला नाही, ती कऱण्याचा प्रत्येकाला हक्क असून त्याचा कोणालाही त्रास होता कामा नये असं स्पष्ट सांगितलं होतं. जर लोक त्याची काळजी घेणार असतील तर आमचं काहीच म्हणणं नाही, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.

मुस्लिम पदाधिकारी काय म्हणाले-

मी माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक ८४ शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक १८ आपणास या पत्राद्वारे कळवत आहे कि, मागील काही दिवसात पक्षात विकास, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिला सक्षमीकरण, हे मुद्दे सोडून जात - धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी माजिद अमीन शेख कोणाच्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारून याची पोहोच द्यावी हि विनंती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.   

Web Title: MNS chief Raj Thackeray has not opposed any of the prayers, said MNS leader Sandeep Deshpande.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.