मुंबई- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली आहे. याच पीएफआयवर पाच दिवसांपूर्वीही देशव्यापी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारनं यावर मोठी कारवाई करते बेकायदेशीर संघटना ठरवत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारनं पीएफआयवर बंदी घातली आहे. अनेक राज्यांनी केंद्राकडे यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयानं पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. याशिवाय पीएफआयच्या आठ सहयोगी संस्थांवरही कारवाई करण्यात आली आहे. पीएफआयशिवाय रिहॅब फाऊंडेशन, कँपस फ्रन्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन, नॅशनल विमेन फ्रन्ट, ज्युनिअर फ्रन्ट, एम्पावर इंडिया फाऊंडेशन आणि रिहॅब फाऊंडेशन केरळ सारख्या संस्थांवरही बंदी घालण्यात आली आहे.
तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक
केंद्र सरकारने पीएफआयवर केलेल्या कारवाईवर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी, असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदनही केलं आहे.
दरम्यान, पीएफआय संस्थेवर बंदी घालण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे भाजपसह देशभरात स्वागत होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रातही या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, त्यासोबतच त्यांच्या संलग्नित ६ संघटनांवरही बदीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे मनसेनं लाडू वाटप करत या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसेने फटाके वाजवून आणि लाडू वाटप करुन जल्लोष साजरा केला.
सरकारने PFI वर बंदी घालताच पुण्यात मनसेनं वाटले मोतीचूर लाडू
१५ राज्यांत छापे-
उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, आसाम आणि मध्य प्रदेश या सात राज्यांमध्ये तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही करावाई करण्यात आली. एनआयए नेतृत्वाखाली विविध तपास संस्थांच्या पथकांनी २२ सप्टेंबर रोजी देशातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याच्या आणि कट्टरवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपावरून पीएफआयविरुद्ध १५ राज्यांत छापेमारी केली होती. यात संघटनेचे १०६ नेते व कार्यकर्त्यांना जेरबंद करण्यात आले होते.