'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 12:11 PM2021-08-31T12:11:32+5:302021-08-31T23:48:06+5:30

Raj Thackeray: परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं राज ठाकरे यांनी सांगितले.

MNS Chief Raj Thackeray has warned the peddlers who are attacking Thane Municipal Corporation officials | 'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

Next

मुंबई/ ठाणे:  कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यास पोलिसांनी अटक केली असून अमरजीत यादव असे त्याचे नाव आहे. सोमवारी पिंपळे यांचे पथक घोडबंदरच्या कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरू होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतानाच संतप्त झालेल्या यादव याने रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून खाली पडली.

सदर घटनेवर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत कोणी असं अधिकाऱ्यांवर हल्ला केला नव्हता. आज हल्ला केलाय आणि त्याला पोलिसांनी अटक केली. उद्या तोच जामिनावर सुटेल व पुन्हा हल्ला करायला मोकळा असेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मात्र ज्या दिवशी हल्लाखोर फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याचदिवशी त्याला मनसैनिक चोप देतील. भीती काय असते ते त्याला दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

गाडी जप्त केल्यानेच हल्ला

यावेळी येथील स्थानिक नागरिक आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी यादव याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु, पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे समजताच त्याने तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळ चालणाऱ्या या थरारनाट्यानंतर त्याला शिताफीने पकडून कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याची गाडी जप्त केल्यानेच राग मनात धरून त्याने हा हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज आता वर्तविण्यात आला आहे.

Web Title: MNS Chief Raj Thackeray has warned the peddlers who are attacking Thane Municipal Corporation officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.