भाजप बलात्काऱ्यांशी पाठिशी; राज ठाकरेंची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 09:50 PM2018-04-15T21:50:05+5:302018-04-15T21:50:05+5:30

कठुआ बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंचं शरसंधान

mns chief raj thackeray slams bjp over kathua rape incident | भाजप बलात्काऱ्यांशी पाठिशी; राज ठाकरेंची खरमरीत टीका

भाजप बलात्काऱ्यांशी पाठिशी; राज ठाकरेंची खरमरीत टीका

Next

मुंबई: कठुआ बलात्कार प्रकरणावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे. आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार देत आहोत. त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. मात्र भाजप बलात्काऱ्यांच्या पाठिशी आहे, अशी जळजळीत टीका राज ठाकरेंनी केली. काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये झालेल्या बलात्कारांवरुन सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. या दोन्ही प्रकरणांवरुन राज ठाकरेंनी भाजपवर कठोर शब्दांत टीका केली. ते मुलुंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 

'धर्म म्हणजे काय हे न कळणाऱ्या 8 वर्षांच्या चिमुरडीवर कठुआमध्ये बलात्कार झाला. मंदिरात तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला. पोलिसदेखील यात सहभागी होते. या घृणास्पद कृत्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली. हे संतापजनक कृत्य करणाऱ्यांच्या पाठिशी भाजप उभा राहतो. याबद्दल लाज वाटत नाही का?,' अशा शब्दांमध्ये राज भाजपवर बरसले. 

'बलात्कार हा बलात्कारच असतो. त्याकडे हिंदू, मुस्लिम नजरेनं कसं काय पाहिलं जाऊ शकतं? बलात्कार करणारा कोणीही असला, कोणत्याही जाती-धर्माचा असला, तरी त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. बलात्काऱ्यांना भर रस्त्यात मारायला हवं. सौदी अरेबियात ज्या पद्धतीनं बलात्काऱ्यांचे हात-पाय तोडतात. तशीच शिक्षा आपल्याकडेही व्हायला हवी. तरच अशा लोकांच्या मनात भीती निर्माण होईल,' असं राज ठाकरेंनी म्हटलं. 
 

Web Title: mns chief raj thackeray slams bjp over kathua rape incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.