जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:54 PM2024-01-22T12:54:40+5:302024-01-22T12:55:03+5:30

आज अयोध्येत मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे, देशभरात या सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

MNS chief Raj Thackeray tweeted memories of Ram temple in Ayodhya | जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार

जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार

Raj Thackeray ( Marathi News ) : मुंबई- आज अयोध्येत मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे, देशभरात या सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देशातील व्हिआयपी या सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राजव ठाकरे यांनी ट्विट करुन भावूक झाले आहेत. ठाकरे यांनी एका वाक्यात ट्विट केले आहे.

मनसो प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन अयोध्येत राम मंदिरासाठी ज्या कार सेवकांनी लढा उभारला त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. "आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !", असं भावूक ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.  

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल, थोड्याच वेळात रामलला होणार विराजमान!

आज अयोध्येत मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून सेलिब्रिटी, उद्योगपती आले आले आहेत. दरम्यान, या सोहळ्याच्या निमंत्रणावरुनही देशात आरोप-प्रत्यारोप झाले होते. 

परदेशातही राम मंदिर सोहळ्याची धूम

भारतातील राम मंदिर सोहळ्याची धूम परदेशातही पाहायला मिळत आहे. संपूर्ण भारतात जय श्रीराम असा रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमावर होत आहेत. केवळ भारतात नाही, तर परदेशातील रामभक्तांमध्ये राम मंदिर सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रम परदेशातही आयोजित करण्यात आले होते. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे लाडू-पेढे वाटण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

केवळ अमेरिका नाही तर, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड यासह अनेकविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय. सुंदरकांड तसेच रामचरितमानस यांचे पठण केले जात आहे. शोभायात्रा, रॅली काढल्या जात आहेत. ओव्हरसिज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर या संस्थेच्या सदस्यांनी न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे लाडू वाटून राम मंदिर सोहळ्याचा आनंद साजरा करण्यात आला. 

Web Title: MNS chief Raj Thackeray tweeted memories of Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.