Raj Thackeray: कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, लिहिलं खास पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 04:29 PM2021-05-25T16:29:07+5:302021-05-25T16:29:34+5:30

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांत्वन केले आहे.

MNS Chief Raj Thackeray writes condolence letter to party volunteers who lost family members to battle with Corona | Raj Thackeray: कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, लिहिलं खास पत्र

Raj Thackeray: कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, लिहिलं खास पत्र

googlenewsNext

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांत्वन केले आहे. कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक पत्र पाठवून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती दाखवलेल्या आपुलकीचं पक्षामध्ये आणि पदाधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. 

नेमकं काय म्हटलंय पत्रात?
आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.

परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा
आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना

ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो

आपला नम्र
राज ठाकरे

असं कार्यकर्त्यांना धीर देणारं पत्र राज ठाकरे यांनी लिहिलं आहे. प्रत्येक विभाग अध्यक्षाकडे ही पत्र संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 
 

Web Title: MNS Chief Raj Thackeray writes condolence letter to party volunteers who lost family members to battle with Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.