राज ठाकरेंचा नवा लूक व्हायरल; 'त्या' फोटोमुळे पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 08:07 PM2020-08-30T20:07:31+5:302020-08-30T20:39:23+5:30

सध्या सोशल मीडियावर राज ठाकरे यांना नवा लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

MNS Chief Raj Thackeray's new look goes viral; That photo once again sparked a discussion on social media | राज ठाकरेंचा नवा लूक व्हायरल; 'त्या' फोटोमुळे पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत

राज ठाकरेंचा नवा लूक व्हायरल; 'त्या' फोटोमुळे पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत

Next

मुंबई: गेल्या ५ महिन्यांपासून देशासह राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नवनवीन लूक आजमावून पाहिले. यामध्ये बॉलिवूड कलाकारांसह मराठी कलाकार आणि राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. मात्र यामध्ये आता मनसेप्रमुखराज ठाकरे यांची देखील भर पडली आहे.

'काही त्रास नाही ना झाला'; MSEBच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

सध्या सोशल मीडियावरराज ठाकरे यांना नवा लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच तरुणांमध्ये राज ठाकरे यांची अधिक क्रेज आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा हा नवीन लूक तरुणांना आवडल्याचे देखील त्यांच्या फोटोखालील प्रतिक्रियेतून दिसून येत आहे. राज ठाकरे महाराष्ट्राला तसे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये अनेकदा दिसतात. पण या फोटोमध्ये ते जिन्स आणि टिशर्टमध्ये दिसत आहेत. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी दाढी वाढवल्याचे देखील दिसून येत आहे. कधीतरी दाढी ठेवणारे राज ठाकरे अचानक दाढीच्या लूकमध्ये दिसून आल्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा"

दरम्यान मनसेनं जेव्हा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन केलं होतं. त्यावेळी स्वत: राज ठाकरे या मोर्चात सहभागी झाले होते. त्यावेळी देखील राज ठाकरेंचा नवा लूक दिसून आला होता. या मोर्चात राज ठाकरेंचा यांचा भगवा रंगातील नवा लूक समोर आला. राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर डोक्यावर भगव्या रंगाचा टिळा लावला होता. त्याशिवाय मनसेच्या नवा झेंडा असलेला बॅच उजव्या हाताला बांधला होता. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी पांढऱ्या आणि करड्या रंगाचे शूज घातले होते. मात्र या शूजच्या लेसचा रंगही भगवा होता.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

गुंगीचं औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलल्याची घटना

मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

Web Title: MNS Chief Raj Thackeray's new look goes viral; That photo once again sparked a discussion on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.