राज ठाकरेंवरील कारवाई संदर्भात तपास करुन निर्णय घेऊ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:14 AM2022-04-05T11:14:33+5:302022-04-05T11:33:19+5:30

राज ठाकरेंच्या या विधानावरुन महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे.

MNS chief Raj Thackeray's statement will be investigated and action will be taken; Information of Home Minister Dilip Walse-Patil | राज ठाकरेंवरील कारवाई संदर्भात तपास करुन निर्णय घेऊ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

राज ठाकरेंवरील कारवाई संदर्भात तपास करुन निर्णय घेऊ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

googlenewsNext

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला आहे. मशीदींवरील भोंगे उतरविले पाहिजेत. अन्यथा त्यांच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. 

राज ठाकरेंच्या या विधानावरुन महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. तर राज्यात कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले आहेत. यावर पोलिस देखील कारवाई करत आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. समाजात तेढ निर्माण होतील अशी, वक्तव्य करु नये, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. तसेच राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरुन तपास करुन त्यावर कारवाई संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. 

गणपती, नवरात्रीत ध्वनिप्रदूषण होत नाही का?- 

मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?. असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वसही आझमी यांनी व्यक्त केला.

मुस्लिम पदाधिकारी काय म्हणाले-

मी माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक ८४ शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक १८ आपणास या पत्राद्वारे कळवत आहे कि, मागील काही दिवसात पक्षात विकास, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिला सक्षमीकरण, हे मुद्दे सोडून जात - धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी माजिद अमीन शेख कोणाच्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारून याची पोहोच द्यावी हि विनंती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.   
 

Web Title: MNS chief Raj Thackeray's statement will be investigated and action will be taken; Information of Home Minister Dilip Walse-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.