मनसेने केली समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता; विविध संघटनांनी देखील घेतला मोहिमेत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 06:31 PM2021-12-11T18:31:20+5:302021-12-11T18:32:00+5:30

शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह विविध संघटनानी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.

MNS cleans beaches; Various organizations also took part in the campaign | मनसेने केली समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता; विविध संघटनांनी देखील घेतला मोहिमेत सहभाग

मनसेने केली समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता; विविध संघटनांनी देखील घेतला मोहिमेत सहभाग

Next

मुंबई- समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेसाठी मनसेने एक पाऊल पुढे टाकले असून आज सकाळी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दादर चौपाटी पासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी  शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह विविध संघटनानी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.

 मुंबईतील काही ठिकाणातील समुद्राची अवस्था बकाल झाली आहे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर समुद्राचे सौंदर्य खुलू शकेल त्यासाठी सर्व पक्ष व नागरिकांनी समुद्राच्या सौंदर्यासाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन मनसेच्या शर्मिला ठाकरे यांनी केले. मुंबईतील गिरगांव, प्रभादेवी, दादर, माहीम, वांद्रे, वर्सोवा, जुहू आक्सा व दानापानी या किंनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेसाठी शेकडो नागरिकांनी नावनोंदणी केली.

मुंबईसह पालघर, -ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, येथील विविध समुद्र किंनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.तर कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

समुद्राच्या स्वच्छते करिता कोणीतरी पुढे तो दत्तक घेण्यात यावा जेणेकरून समुद्र स्वच्छ राहील आपण जे निर्माल्य टाकतो ते इतरत्र न टाकता तो कलशात टाकावे, प्लास्टिक बंद केले पाहिजे तसेच कचऱ्यासाठी एक डबा ठेवावा त्यापासून चांगले खत देखील तयार होऊ शकेल असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: MNS cleans beaches; Various organizations also took part in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.