फूड डिलिव्हरीत गोमांसाची विक्री, मनसेने थेट गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:17 AM2022-04-08T04:17:10+5:302022-04-08T04:17:48+5:30

Food delivery: मशिदीवरील भोंग्याचा विषय ताजा असतानाच आता मनसेकडून ऑनलाईन गोमांस विक्रीचा मुद्दा उजेडात आणला आहे. त्यासाठी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत निवेदनही दिले.

MNS complains directly to Home Minister about sale of beef in food delivery | फूड डिलिव्हरीत गोमांसाची विक्री, मनसेने थेट गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

फूड डिलिव्हरीत गोमांसाची विक्री, मनसेने थेट गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

Next

मुंबई : मशिदीवरील भोंग्याचा विषय ताजा असतानाच आता मनसेकडून ऑनलाईन गोमांस विक्रीचा मुद्दा उजेडात आणला आहे. त्यासाठी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत निवेदनही दिले. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीकडून मुंबईत थेट गोमांस विक्री केली जात आहे. या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
मुंबईत होणाऱ्या या गोमांस विक्रीबद्दल मनसेचे अंधेरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत, मनविसे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर आणि विजय जैन यांनी गुरुवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीकडून कशाप्रकारे या गोमांसाची विक्री केली जाते, याची माहिती गृहमंत्र्यांना दिली.

Web Title: MNS complains directly to Home Minister about sale of beef in food delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.