मनसेने मिळवून दिला नेस्को कोविड सेंटरच्या २०० कर्मचाऱ्यांना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:22+5:302021-05-11T04:06:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नेस्को कोविड सेंटरमध्ये सतत सात-आठ महिने कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्या २०० परिचारिका, परिचारक, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ...

MNS gets justice for 200 employees of Nesco Kovid Center | मनसेने मिळवून दिला नेस्को कोविड सेंटरच्या २०० कर्मचाऱ्यांना न्याय

मनसेने मिळवून दिला नेस्को कोविड सेंटरच्या २०० कर्मचाऱ्यांना न्याय

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नेस्को कोविड सेंटरमध्ये सतत सात-आठ महिने कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्या २०० परिचारिका, परिचारक, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आले आहेत. त्यांना तात्पुरते राहण्यासाठी उपलब्ध वसतिगृह (म्हाडा इमारत उन्नत नगर) येथून स्थलांतर करून न्यूझीलंड हॉस्टेल-आरे कॉलनी येथे त्यांनी राहावे यासाठी प्रशासन दबाव टाकत होते. मात्र, मनसेने नेस्को कोविड सेंटरच्या २०० कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला.

कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या या योद्ध्यांना आवश्यक मूलभूत सुखसोयी या नवीन ठिकाणी उपलब्ध होणार नाहीत, हे माहिती असतानाही स्थलांतर करावेच लागेल म्हणून दबाव टाकण्यात आला होता.

या सर्व २०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे निवेदन प्राप्त होताच मनसेचे गोरेगाव विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी सर्वप्रथम महानगरपालिका पी दक्षिण कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे आणि नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रादे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणाऱ्या समस्यांची माहिती दिली. त्यानंतर त्वरित त्यांचे होणारे स्थलांतर थांबवण्याचे आदेश दिले. तसेच उचित पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत या विषयास नेस्को प्रशासनाने स्थगिती दिली.

राहण्याची-जेवणाची गैरसोय होत असल्याने गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रविवारी कामबंद आंदोलन पुकारले आणि मनसेकडे दाद मागितली. मनसेने व्यवस्थापनाला धारेवर धरले. तत्काळ व्यवस्थापनाकडून सर्व प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन घेतले.

या प्रसंगी विरेंद्र जाधव यांच्यासोबत स्थानिक उपविभाग अध्यक्ष सचिन सावंत, शाखा अध्यक्ष भूषण फडतरे आणि संजय खानोलकर उपस्थित होते.

------------------------------------------

Web Title: MNS gets justice for 200 employees of Nesco Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.