हजारो मराठी पुस्तके वाटून मनसेने केला माय मराठीचा प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 08:48 PM2019-02-27T20:48:48+5:302019-02-28T00:12:52+5:30
आजच्या तरुण पिढीला वाचन संस्कृतीची गोडी निर्माण व्हावी मराठी साहित्यांचा अनमोल साठा अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहचावा म्हणून मराठी भाषा दिनी पुस्तकाचे वाटप करण्यात आल्याचे मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
मुंबई -आजच्या जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मनसेने महाविद्यालय, शिवाजीपार्क येथील नाना-नानी पार्क मध्ये आजी-आजोबा तसेच प्रभादेवी, दादर माहीम विभागात हजारो मराठी पुस्तके वाटून माय मराठीचा प्रसार केला. आजच्या तरुण पिढीला वाचन संस्कृतीची गोडी निर्माण व्हावी मराठी साहित्यांचा अनमोल साठा अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहचावा म्हणून मराठी भाषा दिनी पुस्तकाचे वाटप करण्यात आल्याचे मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
कीर्ती महाविद्यालय, रुपारेल महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना विवीध विषयांवरील मराठी पुस्तके देण्यात आली. त्याचबरोबर शिवाजीपार्क येथील नाना-नानी पार्क मध्ये आजी-आजोबा व प्रभादेवी, दादर, माहीम विभागात हजारो मराठी पुस्तके वाटण्यात आली.
मराठी भाषा टिकविणे हि आपली नैतिक जबाबदारी आहे मराठी साहित्य, पुस्तके, मराठी ग्रंथ यांचे तरुण पिढीनी जतन करून तीचा प्रसार केला पाहिजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे असे किल्लेदार यांनी सांगितले.