Join us

'हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपालांसाठी'; मनसेने जाहीर केली चित्रफित, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:14 PM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधानावरुन मनसेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. कोश्यारी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र विरोध होत आहे. 

'२७ नोव्हेंबरला प्रत्येकाचा हिशोब होणार'; संदीप देशपांडेंचा दावा, राज ठाकरे संबोधित करणार!

राज्यपालांच्या विधानावरुन मनसेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. काल-आज आणि उद्याही हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची प्रेरणा 'छत्रपती शिवाजी महाराज'च होते आणि अखंड राहतील, हे हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी, आपल्याला कळावं ह्यासाठी ही चित्रफीत असल्याचं मनसेने ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

सदर प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.'

काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?

'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राज ठाकरेभगत सिंह कोश्यारीमनसेछत्रपती शिवाजी महाराज