Join us

'कराची स्विट्स'ला मनसेचा दणका, थेट कोर्टात खेचणार!

By मोरेश्वर येरम | Published: November 19, 2020 12:01 PM

मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक पवित्रा घेतला.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या राजधानीच्या नावानं दुकान चालविण्यास मनसेचा विरोधमनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी कराची स्विट्सला धाडली नोटीसभारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचत असल्याचा मनसेचा दावा

मुंबईमुंबईत 'कराची स्विट्स' नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला आहे. या आस्थापनांच्या मालकांना मनसे थेट कोर्टात खेचणार आहे. मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी 'कराची स्विट्स'च्या व्यवस्थापकांना नोटीस पाठवली आहे. 

मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक पवित्रा घेतला. पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराची शहराच्या नावाने मुंबईत दुकान चालवण्यास मनसेने आक्षेप घेतला आहे. याबाबतच पत्र देखील हाजी सैफ शेख यांनी दुकानाच्या व्यवस्थापकांना पाठवलं आहे. 

'देशाचा पारंपारिक शत्रू देशाची राजधानी 'कराची' या नावाचा आधार घेत मुंबईत 'कराची स्विट्स' नावाची दुकानं सुरू करुन भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचवून व्यवसाय केला जात आहे. तसेच मराठी भाषेचा द्वेष केला जात आहे', असं मनसेचे नेते हाजी सैफ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

हाजी सैफ यांनी याबाबत कराची स्विट्सच्या व्यवस्थापकांना कोर्टात खेचणार असल्याचंही म्हटलं आहे. दुकानावरील नाव तात्काळ हटविण्याची मागणी करत एक कायदेशीर नोटीससुद्धा हैदराबाद येथील कराची स्विट्सच्या व्यवस्थापकांना स्पीडपोस्टने पाठविण्यात आली आहे.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेमुंबई