"राज ठाकरेंना फसवलं जातंय"; तृप्ती सावंतांच्या प्रवेशावरुन मनसे नेत्याचा आरोप; म्हणाला, "झिशान सिद्दीकींनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:55 PM2024-10-30T13:55:34+5:302024-10-30T13:55:44+5:30

मनसे नेते अखिल चित्रे यांनी तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मिळाल्यानंतर गंभीर आरोप केले आहेत

MNS leader Akhil Chitre serious accusations against Tripti Sawant after getting the nomination from Vandre East Assembly | "राज ठाकरेंना फसवलं जातंय"; तृप्ती सावंतांच्या प्रवेशावरुन मनसे नेत्याचा आरोप; म्हणाला, "झिशान सिद्दीकींनी..."

"राज ठाकरेंना फसवलं जातंय"; तृप्ती सावंतांच्या प्रवेशावरुन मनसे नेत्याचा आरोप; म्हणाला, "झिशान सिद्दीकींनी..."

Vandre East Assembly Constituency : माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तृप्ती सावंत उमेदवारी अर्जही देण्यात आली. मात्र आता या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या अखिल चित्रे यांनी तृप्ती सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राज ठाकरे यांची फसवणूक होत असल्याचाही दावा अखिल चित्रे यांनी केला आहे.

तृप्ती सावंत या वांद्रे पूर्वमधीलच माजी आमदार आहेत. सावंत यांच्या उमेदवारीमुळे वांद्रे पूर्वमध्ये ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि काँग्रेस सोडून अजित पवार गटात आलेले झिशान सिद्दीकी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मात्र या मतदारसंघातून मनसेचे अखिल चित्रे उत्सुक होते. मात्र त्यांच्याऐवजी तृप्ती सावंत यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. यानंतर आता अखिल चित्रे यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"खरं तर मी कोणत्याही मेसेज वर व्यक्त होणार नव्हतो परंतु ज्यांना विषय माहीत नाही, विधानसभेची परिस्थिती माहीत नाही, काय घडलं ते माहीत नाही , ते देखील व्यक्त होत आहेत. आणि ते माझेच महाराष्ट्र सैनिक सहकारी आहेत म्हणून काय घडलं हे त्यांना सांगणे मी माझी जबाबदारी समजतो म्हणून मी एक खुलासा करत आहे. मला उमेदवारी मिळाली नाही हा विषयचं नाही पण ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्या मनसेतनं जिंकण्यासाठी नाही तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहत आहेत. सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी वेळ साधारणता रात्री ९:३० - १०:३० दरम्यान ठिकाण मकबा हाईट्स येथे मिटिंग झाली तिथे झिशान सिद्दीकी यांच्याबरोबर सौदा करून फक्त आणि फक्त त्यांच्या सांगण्यावरून निवडणुक मनसेतून लढण्यासाठी ह्या तयार झाल्यात. खार पूर्वचे आमच्या येथील बेचारे हिंदू संघटनेतील कार्यकर्ते समजत आहेत कि ह्या मॅडम त्याउमेदवाराला पाडायला उभ्या आहेत पण त्यांना माहीत नाही त्या तर त्या मुस्लिम आमदाराच्या पैशावरच त्यांच्या सांगण्यावरून उभ्या आहेत. आमच्या वांद्रे पूर्व येथील काही भाजपा प्रेरित हिंदू संघटना आम्ही झिशान सिद्दीकींचे काम करणार नाही हे सांगण्यासाठी ह्या मॅडम बरोबर सागर बंगल्यावर देखील गेले होते, त्यांना काय माहीत की हा खेळ तर त्यालाच जिंकवण्यासाठी ह्या करत आहेत," असा आरोप अखिल चित्रे यांनी केला आहे.

 २८ तारखेला ११ वाजेपर्यंत झिशान भाईंशी चर्चा होई पर्यंत त्यांना मनसे पक्षाची उमेदवारी नको होती, कारण त्याचं आणि त्यांच्या एकच असलेल्या सहकाऱ्यांचं मत होतं कि मनसे पक्षातून जिंकतां येणार नाही मनसेला वांद्र्यात वोट बॅंक नाही. आणखीन खूप काही घडलं २८ तारखेच्या रात्री माझ्यावर माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांचा विश्वास नसेल तर त्याचा देखील खुलासा करीन योग्य वेळी. नाराजगी राजसाहेबांना फसवले जात आहे त्याबाबतीतली आहे आणि प्रयत्न करून पण मी माझ्या साहेबांना सांगण्यासाठी त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी देखील अपयशी झालो. कारण आज सर्व आसपासची लोकं स्वतःला प्रशांत किशोर सारखे strategist समजायला लागले आहेत. त्या मॅडम जिंकल्या तरी मनसे पक्षात राहणार नाहीत आणि हरल्या तरी राहणार नाही, कारण तसं ठरवूनच आणि त्यांच्या Bosses काढून पुनर्वसनाचा वादा घेऊनच त्या मनसेत आल्या,”रात्र भर कभी कभी हां कभी ना” करत मग सकाळी आल्या. माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे मला माहीती आहे आणि गप्प बसणं ह्याला जर काही कमेंट करणारी लोकं राज निष्ठा समजत असतील तर माफी असावी मी असा राज निष्ठा नाही. काहींना प्रश्न पडलेला कि मला २०१९ ला उमेदवारी दिलेली तर मी काय केलं ? उत्तर : ५ हजर मत होते मी लढण्या अगोदर त्यांचे दुप्पट पेक्षा जास्त केलेत, असे अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 

Web Title: MNS leader Akhil Chitre serious accusations against Tripti Sawant after getting the nomination from Vandre East Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.