मुंबई: भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक निर्मितीच्या वादावर मनसेने देखील उडी घेतली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले की, आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही चूक नाही आणि त्यांना या पुस्तकाची कल्पना देखील नसणार असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणशीच करु शकत नाही. भाजपाचे नेते जय भगवान गोयल यांनी पुस्तक लिहून मुर्खपणा केला असून पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना समज देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जय भगवान गोयल सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येऊ शकतात असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.
'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरून बच्चू कडूंची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका
मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी देशात दहशतवादी हल्ले व्हायचे. मुंबई, दिल्लीसह देशभरात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवले जायचे. अगदी संसदेवर हल्ले करण्यापर्यंत दहशतवाद्यांची मजल गेली होती. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही मोठा दहशतवादी झालेला नाही, असा दावा गोयल यांनी केला. पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात झालेल्या हल्ल्यांना सर्जिकल स्ट्राइकनं प्रत्युत्तर देण्याची धमक मोदींनी दाखवली असल्याचे जय भगवान गोयल यांनी सांगितले.
'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच पुस्तकाला 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी जय भगवान गोयल दर्शवली आहे.