तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:28 AM2021-07-20T11:28:11+5:302021-07-20T11:28:32+5:30

नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे.

MNS leader Nitin Sardesai has warned the Adani group against the backdrop of Navi Mumbai airport | तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा

तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा

googlenewsNext

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) व्यवस्थापन अदानी समूहाच्या ताब्यात आले आहे. स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र- राज्य सरकार व सिडकोची मान्यता मिळाल्यानंतर मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंगकडे देण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. त्यामुळे आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला आहे. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीत जीव्हीके समुहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के, बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका’यांची भागीदारी १० टक्के होती. फेब्रुवारी २०२१मध्ये अदानी समुहाने २३.५० टक्के हिस्सा १ हजार ६८५ कोटी रुपयांना खरेदी केला.  आता जीव्हीके समुहाकडील ५०.५० टक्के हिस्सा ताब्यात आल्याने अदानी समूह एकूण ७४  टक्क्यांचा भागीदार होईल. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे.

Adani Airport Holdings च्या लीडरशिपमध्ये मोठे बदल; आता मुंबईत नाही, तर अहमदाबादमध्ये असेल मुख्यालय

दरम्यान, टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईला गौरवान्वित वाटावे असे काम करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय. लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवा रोजगार देऊ, असं आश्वासन अदानी यांनी दिलं आहे.

गेल्या वर्षी तीन ठिकाणचे व्यवस्थापन मिळाले

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची स्थापना २ मार्च २००६ रोजी झाली होती. ही कंपनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, निर्मिती आणि परिचालनाचे काम करते. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही अदानी एन्टरप्राईजेसची उपकंपनी त्यांच्या अखत्यारीतील विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. गेल्या वर्षी मंगळुरू, लखनऊ आणि अहमदाबाद विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समुहाच्या ताब्यात आले होते.

Web Title: MNS leader Nitin Sardesai has warned the Adani group against the backdrop of Navi Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.