Join us

'...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, लक्षात ठेवा'; मनसेने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 1:20 PM

कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे.

मुंबई: राज्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय आरोप- प्रत्यारोप देखील गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरु आहे. मुंबईतील वांद्रे स्थनकाजवळ मंगळवारी परप्रांतीयांची गर्दी जमल्याचा प्रकार घडला होता. यानंतर भाजपाने सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच भाजपाच्या समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोशल मीडियावरुन करण्यात येत होती. या सर्व प्रकरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संकटाच्या काळात राजकारण करु नका असं आवाहन देखील केलं होतं. आता मनसेनेहीउद्धव ठाकरेंच्या समर्थनांसाठी मैदानात उतरली आहे.

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्राच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयत्न केला तर, मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा असं रुपाली पाटील यांनी सांगतिले. तसेच राज ठाकरे विनंती करत नाही तर थेट जाळ काढतात असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे.

तत्पूर्वी, कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. कारण कोरोनाच्या आव्हानाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचं म्हटलं होतं.  विविध राजकीय पक्षांचे नेते पक्षाची लेबल बाजूला ठेवून कोरोनाविरुद्ध लढत आहेत. पंतप्रधान मोदी आमच्यासोबत आहेत. अमित शहा यांच्याशी मी आजच बोललो. सोनिया गांधी, शरद पवार तर आहेतच राजदेखील सोबत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला होता.

जी उपाययोजना करायची आहे, ती सगळी पावलं टाकली जात आहेत, वैद्यकीय खबरदारी घेतली जातेय, अन्न-धान्याची पूर्तता, कष्टकरी-कामगार वर्ग यांची काळजी घेतली जात आहे. वांद्रे स्टेशनजवळ घडलेला प्रसंग दुर्दैवी आहे, कुणीतरी रेल्वेबाबत अफवा पसरवली, डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत, जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. राजकीय पक्षांना आवाहन करतो की, राजकारण लोकशाहीत चालतच असतं, पण ही वेळ राजकारणाची नाही, देशावर गंभीर संकट आहे अन् प्रशासनावर ताण आहे, जे एकत्रितपणे काम करत आहेत, त्यांना सहकार्य करा, पक्ष विसरून सरकारला मदत करा, असं आवाहनही पवारांनी केलं आहे.   

CoronaVirus ...तर लॉकडाऊनही निष्प्रभ ठरेल; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केले सावध

दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० ते १००० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संबंधित अफवा पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विनय दुबेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमनसेशिवसेनाभाजपामहाराष्ट्र सरकार