Join us

"अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची बदली करुन घेण्यात उद्धव ठाकरे व्यस्त आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 5:27 PM

सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत, असा निशाणा संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर लगावला आहे.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासनावर वचक नाही. सध्या उद्धव ठाकरे फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये कोणता अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्याची त्यांना हव्या असणाऱ्या विभागात बदली करून घेणे यामध्ये उद्धव ठाकरे व्यस्त आहेत, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकाने कोरोनाच्या काळात ओरबाडण्याचं काम केलं आहे. पत्रकार पांडुरंग रायकर हे एक उदाहरण आहेत. अशा पद्दतीची अनेक उदाहरण सध्या राज्यात पाहिला मिळत आहेत. यामध्ये अँब्युलन्स मिळाली नाही, रूग्णालयात बेड नाही मिळाला. प्रत्यक्षात रुग्णांना उपचार मिळालेले नाही. सरकाने फक्त कोरोनाच्या नावावर पैसे ओरबाडण्याचं काम केलं आहे, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच पुण्यातील जंबो कोरोना सेंटरचं उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांआधीच उद्घाटन केलं. मात्र त्याचा उपयोग काहीच नाही. हे सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत, असा निशाणा संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर लगावला आहे.

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; पती- पत्नीने खातं उघडल्यास दर महिन्याला मिळेल दुप्पट फायदा

उद्धव ठाकरेंना ग्राउंड लेव्हलला काय परिस्थिती आहे हे घरात बसून कळणार नाही. यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. लोकांमध्ये गेल्याशिवाय प्रश्न समजत नाहीत. हे  उद्धव ठाकरेंना कधी कळणार आहे. सध्या लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना कसं जीवन जगायचं हा प्रश पडला आहे. या सगळयांमध्ये  उद्धव ठाकरे काय करत आहेत. ते कधी बाहेर पडणार आहेत. कधी सर्वसामान्यांना दिलासा देणार आहेत, असे सवालही संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.

दरम्यान, भाजपाने देखील उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना देखील उद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच राज्यभरात आज जो विस्कळीतपणा सुरु आहे, तो याआधी कधीच नव्हता असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य

काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेसंदीप देशपांडेमनसेराज ठाकरेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीशिवसेना