Join us

'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 8:44 AM

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसावर टीका केली. यंत्रणा आमच्याकडेही आहेत, फक्त ईडी नाही. जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपासुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. 

संजय राऊतांच्या या विधानावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. अडीच वर्षे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असून काही करू शकला नाहीत, ४८ तास ईडी घेऊन काय करणार?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ईडी चालवायला पण अक्कल लागते "ढ"टीमचं काम नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा भाजपाचा डाव आहे. मुंडे कुटुंबाच आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचे नातं आहे. आणि आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी असल्याचेही राऊत म्हणाले होते.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासहित विरोधी पक्षांनेत्यांशी संपर्क साधला आहे. त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून बैठकीसाठी निमंत्रण दिलं आहे. याचं निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आहे पण शिवसेनेकडून एक प्रतिनिधी या बैठकीला असणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :संदीप देशपांडेसंजय राऊतशिवसेनामनसेउद्धव ठाकरे