बाळासाहेबांना हे कदापही पटलं नसतं, शिवसेना अन् भाजपाची भूमिका काय?; देशपांडेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:48 AM2023-06-29T11:48:12+5:302023-06-29T11:48:52+5:30
विश्वचषक खेळण्यास पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
मुंबई: भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने शंभर दिवस शिल्लक असताना मंगळवारी जाहीर केले. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे.
सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
विश्वचषक खेळण्यास पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणारं आहे. हे मा. बाळासाहेबांना कदापही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं, हे तर पटूच शकत नाही. यावर भाजपा आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उ बा ठा यांना विचारत नाही आहे, कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, अशी टीकाही यावेळी संदीप देशपांडे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2023
दरम्यान, हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या दहा स्थळांवर सामने होतील. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात भारतीय संघाचा एक-एक सामना होणार आहे. तसेच पहिला उपांत्यफेरीचा सामना देखील मुंबईत होणार आहे. यासोबतच मुंबई आणि पुण्यात इतर संघाचे काही सामने देखील होणार आहे.
वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक
५ ऑक्टोबर इंग्लंड वि. न्यूझीलंड अहमदाबाद
६ ऑक्टोबर पाकिस्तान वि. क्वालिफायर १ हैदराबाद
७ ऑक्टोबर बांगलादेश वि. अफगाणिस्तान धर्मशाला
७ ऑक्टोबर द. आफ्रिका वि. क्वालिफायर २ दिल्ली
८ ऑक्टोबर भारत वि. ऑस्ट्रेलिया चेन्नई
९ ऑक्टोबर न्यूझीलंड वि. क्वालिफायर १ हैदराबाद
१० ऑक्टोबर इंग्लंड वि. बांगलादेश धर्मशाला
११ ऑक्टोबर भारत वि. अफगाणिस्तान दिल्ली
१२ ऑक्टोबर पाकिस्तान वि. क्वालिफायर २ हैदराबाद
१३ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका लखनौ
१४ ऑक्टोबर इंग्लंड वि. अफगाणिस्तान दिल्ली
१४ ऑक्टोबर न्यूझीलंड वि. बांगलादेश चेन्नई
१५ ऑक्टोबर भारत वि. पाकिस्तान अहमदाबाद
१६ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर २ लखनौ
१७ ऑक्टोबर द. आफ्रिका वि. क्वालिफायर १ धर्मशाला
१८ ऑक्टोबर न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान चेन्नई
१९ ऑक्टोबर भारत वि. बांगलादेश पुणे
२० ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान बंगळुरू
२१ ऑक्टोबर इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका मुंबई
२१ ऑक्टोबर क्वालिफायर १ वि. क्वालिफायर २ लखनौ
२२ ऑक्टोबर भारत वि. न्यूझीलंड धर्मशाला
२३ ऑक्टोबर पाकिस्तान वि. अफगाणिस्तान चेन्नई
२४ ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश मुंबई
२५ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर १ दिल्ली
२६ ऑक्टोबर इंग्लंड वि. क्वालिफायर २ बंगळुरू
२७ ऑक्टोबर पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका चेन्नई
२८ ऑक्टोबर क्वालिफायर १ वि. बांगलादेश कोलकाता
२८ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड धर्मशाला
२९ ऑक्टोबर भारत वि. इंग्लंड लखनौ
३० ऑक्टोबर अफगाणिस्तान वि. क्वालिफायर २ पुणे
३१ ऑक्टोबर पाकिस्तान वि. बांगलादेश कोलकाता
१ नोव्हेंबर न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका पुणे
२ नोव्हेंबर भारत वि. क्वालिफायर २ मुंबई
३ नोव्हेंबर क्वालिफायर १ वि. अफगाणिस्तान लखनौ
४ नोव्हेंबर इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया अहमदाबाद
४ नोव्हेंबर न्यूझीलंड वि. पाकिस्तान बंगळुरू
५ नोव्हेंबर भारत वि. दक्षिण आफ्रिका कोलकाता
६ नोव्हेंबर बांगलादेश वि. क्वालिफायर २ दिल्ली
७ नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान मुंबई
८ नोव्हेंबर इंग्लंड वि. क्वालिफायर १ पुणे
९ नोव्हेंबर न्यूझीलंड वि. क्वालिफायर २ बंगळुरू
१० नोव्हेंबर द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान अहमदाबाद
११ नोव्हेंबर भारत वि. क्वालिफायर १ बंगळुरू
१२ नोव्हेंबर इंग्लंड वि. पाकिस्तान कोलकाता
१२ नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश पुणे
१५ नोव्हेंबर पहिला उपांत्य सामना मुंबई
१६ नोव्हेंबर दुसरा उपांत्य सामना कोलकाता
१७ नोव्हेंबर राखीव दिवस —————
१९ नोव्हेंबर फायनल अहमदाबाद
२० नोव्हेंबर राखीव दिवस ——————