"टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका" 

By मुकेश चव्हाण | Published: January 13, 2021 09:52 AM2021-01-13T09:52:06+5:302021-01-13T10:03:20+5:30

टेस्ला कंपनी कर्नाटकला गेल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. 

MNS leader Sandeep Deshpande has Tount to Minister Aditya Thackeray over Tesla's move to Karnataka. |  "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका" 

 "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका" 

googlenewsNext

मुंबई: अवघ्या काही दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेले दिग्गज उद्योजक एलन मस्क यांच्या इलेक्ट्रीक कार आता भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. टेस्ला बंगळुरुमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटद्वारे काम सुरु करणार आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले. 8 जानेवारीला नोंदणी करण्यात आली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हीड जॉन फेंस्टीन कंपनीचे संचालक आहेत. तनेजा टेस्लाचे सीईओ आहेत. उर्वरीत दोघे संचालक पदावर आहेत. कंपनी भारतात मॉडेल ३ लाँच करण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत या कारची विक्री सुरु होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टेस्ला कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुक करेल, असं बोललं जात होतं. मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट केलं होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की, मला उद्योगमंत्री शुभाष देसाई आणि टेस्ला टीमसोबत व्हिडिओद्वारे संवाद साधण्याची सधी मिळाली. टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणुक करेल, यावर माझा विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र टेस्ला कंपनी कर्नाटकला गेल्याने मनसेने आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट केलं होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की, मला उद्योगमंत्री शुभाष देसाई आणि टेस्ला टीमसोबत व्हिडिओद्वारे संवाद साधण्याची सधी मिळाली. टेस्ला कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुक करेल, यावर माझा विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. या ट्विटचा फोटो शेअर करत मनसेने टोला लगावला आहे. ''टेस्ला कंपनी कर्नाटकला गेली, पेज 3 मंत्र्यांना झटका" असं म्हणत बोलाची कढी बोलाचा भात, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

गडकरींनी केले होते सुतोवाच

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर भाष्य केले होते. अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या टेस्ला फार प्रगत आहे. टेस्ला विक्रीबरोबर आपल्या कामकाजाला सुरुवात करेल. यानंतर कारच्या बाबतीत लोकांचा प्रतिसाद पाहून ते गाड्यांच्या असेम्बल आणि उत्पादनानंदर्भात विचार करतील. एवढेच नाही, तर पुढील पाच वर्षांत भारत क्रमांक एकचे मॅन्युफॅक्चरिंग हब होईल, असेही गडकरी यांनी म्हटले होते.

या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा - 

असे बोलले जाते, की टेस्ला कारची आयात चीनवरून करण्याची शक्यता आहे आणि त्या ऑनलाईनच विकेल. डिलरशिपच्या माध्यमाने कारची विक्री होणार नाही. या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा आहे. या कारमध्ये 500 किलोमीटरपर्यंतची रेंज आणि 162 किमी प्रति तासची टॉप स्पिड असेल. मात्र, यासंदर्भात कंपनीने अधिकृत भाष्य केलेले नाही.

Web Title: MNS leader Sandeep Deshpande has Tount to Minister Aditya Thackeray over Tesla's move to Karnataka.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.