...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 09:41 AM2020-08-04T09:41:03+5:302020-08-04T09:51:44+5:30
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
मुंबई: कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासचा अडथळा येत आहे. वारंवार अर्ज करूनही ई-पास नामंजूर होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. पास नामंजूर होणाऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारे सर्वाधिक असून दुसरीकडे खासगी एजंटनेही ई-पाससाठी शुल्क वाढविल्याने चाकरमान्यांची आर्थिक लूट होत आहे. ई-पाससाठी कोणतेही शुल्क नसताना मोठ्या प्रमाणात पैसे आकरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले...
गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागलेलं आहे. मात्र यंदाचा गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने कोकणातच साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी हे कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी उत्सुक आहेत. ई-पासच्या नावाखाली कोकणवासियांची काही दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचे उघड झालेलं आहे. त्यामुळे ई-पासचा काळाबाजार करुन चाकरमान्यांची फसवणूक करणार्या दलालांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठोकून काढेल. असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे.
'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा
...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा
सर्वसामन्य व्यक्तीने ई-पाससाठी अर्ज केला तर त्याला ई-पास मिळत नाही. मात्र एखाद्या दलालाने अर्ज केला तर त्याला ई-पास मिळतो, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच ई-पासचा काळाबाजर संपूर्ण राज्यभरात चालत असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी यासबंधित त्यांनी एक ऑडिओ क्लिप देखील ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामुळे राज्य सरकार ई-पासचा काळाबाजार करणाऱ्यावर कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.
परप्रतियांना फुकट सोडणारे सरकार दलालांच्या मार्फत जनतेला लुटत आहे pic.twitter.com/6qOemfN18S
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 3, 2020
मनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य
कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासचा अडथळा येत आहे. वारंवार अर्ज करूनही ई-पास नामंजूर होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. पास नामंजूर होणाऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारे सर्वाधिक असून दुसरीकडे खासगी एजंटनेही ई-पाससाठी शुल्क वाढविल्याने चाकरमान्यांची आर्थिक लूट होत आहे. आठवड्याभरात चार वेळा पाससाठी अर्ज केला मात्र तो नामंजूर झाल्याचे कणकवली येथे जाणाऱ्या एका चाकरमान्याने सांगितले. परप्रातींय त्यांच्या राज्यातील गावाला जाऊन पुन्हा आले तरी आम्हाला मात्र आमच्याच राज्यातील गावात जाता येत नाही. सरकार बाकीच्या सुविधा देऊ शकत नाही निदान ई-पासची कटकट तरी रद्द करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे.