'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 01:55 PM2020-02-16T13:55:55+5:302020-02-16T13:56:01+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्याच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे.

MNS leader Shalini Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi | 'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?'

'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?'

Next

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्याच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. मात्र ट्रम्प यांच्या होणाऱ्या रोड शो दरम्यान त्यांच्या मार्गातील असणाऱ्या झोपड्या दिसू नये यासाठी एक ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या या भूमिकेवरुन विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यातच आपण फक्त भिंती उभारणार आहोत की, विषमतेच्या या भिंती पाडण्यासाठी प्रयत्न पण करणार आहोत असा सवाल मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

झोपडपट्टी झाकण्यासाठी उभारली जातेय भिंत, रहिवासी भाजपावर खवळले

गेल्या अनेक दिवसांपासून डोनल्ड ट्रम्प यांच्या रोड शो दरम्यान अहमदाबादमधील गरिब भागातील झोपड्या दिसू नये यासाठी भिंती उभारण्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. त्यातच गुजरातमधील भुजमधील एसएसजीआय या हॉस्टेलमध्ये ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळीत कोण आहे याची तपासणी करण्यासाठी चक्क त्यांना कपडे काढायला बळजबरी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावर शालिनी ठाकरे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना गरिबांच्या झोपड्या दिसू नये म्हणून भिंत उभारणारं सरकार, मासिक पाळीची ही बातमी ट्रम्प यांच्यापर्यत पोहचू नये यासाठी आणखी कोणती नवी भिंत उभारण्याचा विचार सरकार करत आहे असा सवाल उपस्थित केला आहे. 

शालिनी ठाकरेंनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमधल्या मुलींच्या वसतीगृहातील ६८ मुलींना मासिक पाळी आलीय का, हे तपासून पाहण्यासाठी त्यांच्या शिक्षिकांनी त्यांना नग्न करून तपासणी केली. कारण काय तर म्हणे, मासिक पाळी असतानाही काही मुली वसतीगृहाच्या स्वयंपाकघरात जातात, मंदिराच्या आसपास फिरतात आणि इतरांना स्पर्श करतात, अशी तक्रार तिथल्या वॉर्डनने केली. अशाच प्रकारच्या घटना इतरही ठिकाणी घडत असतात. पण दुर्दैवाने त्या उघडकीस येत नाहीत. त्यामुळे दोषींवर कारवाईच होत नाही. महिलांचा- विद्यार्थिनींचा अपमान होणं काही थांबत नाही. 

खळबळजनक!... म्हणून ६८ विद्यार्थिनींना चक्क कपडे उतरवायला केली बळजबरी 

मला प्रश्न पडलाय की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांना गरीबांच्या झोपड्या दिसू नयेत म्हणून भिंत उभारणारं सरकार, मासिक पाळीची ही बातमी ट्रम्प ह्यांच्यापर्यंत पोहोचू नये, ह्यासाठी कोणती आणखी कोणती नवी भिंत उभारण्याचा विचार करत असेल? आणि हो, आपण फक्त भिंती उभारणार आहोत की, विषमतेच्या ह्या भिंती पाडण्यासाठी प्रयत्न पण करणार आहोत? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा ब्रिजशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक झोपड्या आहेत. त्या लपवण्यासाठी ही भिंत उभारली जात आहे. विशेष म्हणजे, भिंत उभारण्यात येत असल्याचे महापौरांनाच माहीत नाही. मी भिंत पाहिलेली नाही. मला याबाबत काहीच माहीत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअममध्ये अमेरिकामध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी'सारख्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. 

Web Title: MNS leader Shalini Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.