"कोरोनात जन्मलेला सोनू सूद नावाचा मसीहा कुठेय?; कोकणच्या पूरपरिस्थितीत महात्मा गायब आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:59 PM2021-08-03T12:59:52+5:302021-08-03T13:13:39+5:30

मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी विचारला आहे. 

MNS leader Shalini Thackeray has questioned Bollywood actor Sonu Sood | "कोरोनात जन्मलेला सोनू सूद नावाचा मसीहा कुठेय?; कोकणच्या पूरपरिस्थितीत महात्मा गायब आहेत"

"कोरोनात जन्मलेला सोनू सूद नावाचा मसीहा कुठेय?; कोकणच्या पूरपरिस्थितीत महात्मा गायब आहेत"

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. याचपार्श्वभूमीवर सरकारसह राज्यातील विविध राजकीय पक्ष, संस्था कोकणवासियांच्या मदतील धावून जात आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कुठे आहे, असा प्रश्न मनसेने विचारला आहे.

लॉकडाऊनमध्ये सोनू सूदनं परराज्यांतील मजूर, कामगार, कुटूंब यांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली होती. अन्नधान्य वाटपही केले होते. कुणी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून साद घातली तर सोनू सूद मदतीसाठी सदैव तत्पर असायचा. राज्यात भयाण पूरस्थिती होऊनही सोनू सूदनं एकदाही मदतीचा हात स्वतःहून पुढे का केला नाही, असा सवाल मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

शालिनी ठाकरे ट्विट करत म्हणाल्या की, कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी विचारला आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्यानंतर अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. भारतात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशाच्या विविध भागात राहाणारे मजूर आपल्या घरात परतण्याचा प्रयत्न करू लागले होते. रेल्वे, बस यांसारखी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांना चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा मजुरांना सोनू सुदने स्वतः खर्च करत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं होतं.

विशेष म्हणजे, जगभरातील उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत केली होती. यासह, सोनू सूदने कोरोना संकट काळात कार्यरत सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगारांना देखील भरपूर मदत केली आहे.

Read in English

Web Title: MNS leader Shalini Thackeray has questioned Bollywood actor Sonu Sood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.