उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 04:25 PM2022-05-14T16:25:29+5:302022-05-14T16:30:02+5:30

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत.

MNS leader Yogesh Chile has demanded that Aurangabad be renamed as Sambhajinagar | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

googlenewsNext

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा, वांद्रे पूर्व येथेल बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत.

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरेंच्या आज होणाऱ्या सभेपूर्वी मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी एक मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंची आज होणारी सभा म्हणजे 'टोमणे सभा' आहे. उद्धव ठाकरेंनी आज होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावं, असं योगेश चिले यांनी म्हटलं आहे. 

आज मुंबईत शिवसेनेची सभा आहे. या सभेतून उद्धव ठाकरे भाजप आणि मनसेचा समाचार घेण्याची शक्यता आहे. भाजप आणि मनसेकडून सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा समाचार मुख्यमंत्री ठाकरे आजच्या सभेतून घेऊ शकतात. 

उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकादेखील सुरू आहे. जूनमध्ये शिवसेनेचा स्थापना दिन आहे. त्यावेळी औरंगाबादमध्ये महामेळाव्याचं आयोजन करण्यात येईल, असंही राऊत यांनी सांगितलं.

Web Title: MNS leader Yogesh Chile has demanded that Aurangabad be renamed as Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.