कितीही विरोध झाला तरी शनिवारी सकाळी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं. मातोश्रीबाहेर शुक्रवारी सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलं होतं. शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या सर्व शिवसैनिकांचे हात जोडून आभार मानले. दरम्यान, या प्रकरणावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
“मातोश्रीचा दरारा असा होता की, समोरचा नुसता थरथर कापायचा. पण आता मातोश्रीच्या आत राहणारे थरथर कापायला लागले आहेत…!!!,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.