रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 06:28 PM2020-08-26T18:28:35+5:302020-08-26T19:41:00+5:30

डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता.

MNS MLA Raju Patil has gone in front of Shiv Sena MP Shrikant Shinde's bungalow and shown the pit on the road. | रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा

रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा

Next

मुंबई: मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असं म्हणत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. राजू पाटील यांच्या या विधानानंतर शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले होते. 

शिवसेनेचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे म्हणाले की, ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल, असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना दिले होते. या टीकेनंतर राजू पाटील यांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यासमोरच जाऊन रस्यावर असलेला खड्डा दाखवला. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसे वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तत्पूर्वी, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने लोकलसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहनसेवेच्या बस, रिक्षा, टॅक्सी, स्वत:ची दुचाकी, चारचाकी घेऊन नोकरदारवर्ग मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कर्जत, कसारा, भिवंडी, ठाणे व मीरा-भाईंदरपर्यंत प्रवास करीत आहे. तेथे जाण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना शीळ-कल्याण-भिवंडी या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच, या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता.

उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. 

राजू पाटील यांच्या या टीकेनंतर  ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल, असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना दिले होते.

रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याण शीळ रसत्यावर वाहतुकीचा ताण आहे. वेळ मिळतोय तसा पॅचवर्क, डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. या रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरणाचं काम सुरु आहे. कोरोनाचं संकट असूनसुद्धा या रस्त्याचं काम बंद पडले नाही. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे खड्डे होत आहे. मात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरु असून लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे; सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची डरकाळी

मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

'शहरातील खड्ड्यांचा त्रास मलाही झाला'; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली उघड नाराजी

Web Title: MNS MLA Raju Patil has gone in front of Shiv Sena MP Shrikant Shinde's bungalow and shown the pit on the road.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.