अयोध्येसाठी मनसेला हव्यात दहा रेल्वेगाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 01:02 PM2022-04-21T13:02:19+5:302022-04-21T13:03:03+5:30

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा भव्य करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. यादृष्टीने पक्षाकडून काटेकोर नियोजनही सुरू आहे. या दौऱ्यातून संभाव्य शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे.

MNS needs ten trains for Ayodhya | अयोध्येसाठी मनसेला हव्यात दहा रेल्वेगाड्या

अयोध्येसाठी मनसेला हव्यात दहा रेल्वेगाड्या

Next

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्यावारीची घोषणा केली. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर अयोध्येला पोहोचणार आहेत. मनसे कार्यकर्त्यांना अयोध्येत पोहोचता यावे, यासाठी दहा रेल्वेगाड्यांची मागणी मनसेनेरेल्वेकडे केली आहे.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा भव्य करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. यादृष्टीने पक्षाकडून काटेकोर नियोजनही सुरू आहे. या दौऱ्यातून संभाव्य शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे.  पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी यासंदर्भातील पत्र रेल्वेला पाठविले आहे. दरम्यान, मनसेने मशिदींवरील भोंग्यांनंतर आता सीसीटीव्हीचा मुद्दाही उपस्थित केला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मशिदीत सीसीटीव्ही का बसविले जात नाहीत, असा प्रश्न केला आहे.

जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु, मशिदीत सीसीटीव्ही आहेत का? ‘सर्वधर्मीय’ प्रार्थना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
 

 

Web Title: MNS needs ten trains for Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.