Join us

‘मनसे स्टाइल’विरोधात पालिका अधिकारी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 1:24 AM

अधिकाऱ्यांना डांबून जाब विचारण्याच्या मनसे स्टाइलविरोधात पालिका अधिका-यांनी दंड थोपटले आहेत.

मुंबई : अधिकाऱ्यांना डांबून जाब विचारण्याच्या मनसे स्टाइलविरोधात पालिका अधिका-यांनी दंड थोपटले आहेत. जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यासह परवाना विभागाच्या अधिकाºयाला झालेली धक्काबुक्की तसेच शिवीगाळ प्रकरणी कर्मचाºयांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. मनसेच्या संबंधित पदाधिकाºयांना दोन दिवसांत अटक न झाल्यास संपूर्ण २४ विभाग कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.लोअर परळ आणि वरळी या भागांमध्ये फेरीवाल्यांवर काय कारवाई केली? याचा जाब विचारण्यास गेलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग प्रमुख संतोष धुरी यांनी परवाना अधिकारी आणि सहायक आयुक्त जैन यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाºयांविरोधात पालिकेने एफआयआर दाखल केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ ‘जी दक्षिण’ विभागात सोमवारी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला २४ विभागांतील सहायक आयुक्त व सहायक अभियंत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.सहायक आयुक्त जैन यांच्या दालनात म्युनिसिपल मजदूर युनियनच्या पदाधिकाºयांसह एक बैठक झाली. या बैठकीत मनसेच्या पदाधिकाºयांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाºयांचे हल्ले खपवून घेणार नाही, असा इशारा अधिकाºयांनी दिला. दोन दिवसांत मनसे पदाधिकाºयांना अटक न झाल्यास २४ विभागांमध्ये काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा अन्य विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी दिला.>मनसे आंदोलन तीव्र करणारएकीकडे ‘जी दक्षिण’ विभागात काम बंद आंदोलन सुरू असताना मनसेच्या वतीने फेसबुक लाइव्ह करून जैन चोर असल्याच्या घोषणा देण्यात आल्या. ‘जी दक्षिण विभागाचे चोर व भ्रष्ट सहायक आयुक्तांचा निषेध’ अशा मजकुराचे फलक लोअर परळ भागामध्ये लावून निषेध नोंदविण्यात आला. यापुढे ‘सहायक आयुक्त जैन चोर’ अशा प्रकारचा ‘हॅश टॅग’ चालवूनच मोहीम चालवली जाणार असल्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

टॅग्स :मनसे