Join us

उल्हासनगरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील खत प्रकल्पाला मनसेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 5:24 PM

उल्हासनगरात डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, महापालिकेने काही ठिकाणी कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण सुरू केले.

उल्हासनगर : कॅम्प नं-१ येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील ओला कचऱ्याचा पासून खत करणाऱ्या योजनेला मनसेने विरोध केला. शहरातील ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्याचा पासून खत निर्माण करण्यासाठी उद्याने, खुल्या जागेत खत निर्माण करण्याची महापालिकेची योजना आहे. 

उल्हासनगरात डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, महापालिकेने काही ठिकाणी कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण सुरू केले. त्यासाठी पालिका उद्याने व खुल्या जागा अश्या २० ठिकाणची निवड करण्यात आली. त्यातील कॅम्प नं-१ धोबिघाट येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वारीने ओला कचऱ्या पासून खत निर्माती करण्यासाठी बांधकामे केल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली. ओला कचऱ्या पासून खत निर्माती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे उद्यान दिसली काय? असा थेट प्रश्न मनसेचे मैंनुद्दीन शेख यांच्यासह शहर मनसेच्या पदाधिकार्यांनी करून, खत निर्माती दुसऱ्या उद्यान मध्ये हलविण्याची मागणी केली.

शहरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला असून उसाटने गाव हद्दीतील डम्पिंगचा प्रश्न लांबणीवर पडला. डम्पिंगवरील कचऱ्यात घट होण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाने सुरू केले. मात्र ओला कचऱ्याचे खत करण्यासाठी बंद पडलेल्या उद्यानाचा उपयोग महापालिका आरोग्य विभागाने करावा अशी मागणी मनसेकडून होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील खत योजना दुसरीकडे हलविण्याची मागणी मनसेने महापालिकेकडे केली. अशी माहिती मैनिद्दीन शेख यांनी दिली.

टॅग्स :उल्हासनगर