Raj Thackeray: "...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं", राज ठाकरेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:40 PM2023-03-10T12:40:28+5:302023-03-10T12:42:18+5:30

आज 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते.

MNS President Raj Thackeray has write a special letter for Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary | Raj Thackeray: "...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं", राज ठाकरेंची खास पोस्ट

Raj Thackeray: "...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं", राज ठाकरेंची खास पोस्ट

googlenewsNext

shivjayanti 2023 । मुंबई : आज 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. राज्यभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी शोभायात्रांसह खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे  यांनी त्यांच्या शैलीत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज यांनी पत्राद्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीमुळे हा खंडप्राय देशातील हिंदू मन पुन्हा ताठ उभी राहू लागली असे म्हटले. 

राज यांनी पत्राद्वारे म्हटले, "आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे आपले जीवितकार्य आहे व आपण ईश्वरी इच्छेचे वहनकर्ते आहोत ह्याची पुरेपूर जाणीव असणारे महाराज. त्याकाळी इस्लामी राजवटीच्या आक्रमणात हिंदू राजवड धडाधड कोसळत होत्या. एखाद दुसरी घटना सोडली तर शतकानुशतकं अस्वस्थ हिंदू मनांना उभारी देईल अशी एकही घटना घडत नव्हती. बरं, इस्लामी राजवटी जिंकत होत्या, तो विजय काही त्या संस्कृती फार विकसित किंवा सुसज्ज होत्या म्हणून होत नव्हता. त्या आपल्या देशावर राज्य करू शकल्या कारण आपण आत्ममग्न होतो, हिंदुधर्मीय म्हणून एकजूट नव्हतो."

तेव्हा हिंदवी स्वराज्य आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं - राज ठाकरे 
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीमुळे हा खंडप्राय देशातील हिंदू मनं पुन्हा ताठ उभी राहू लागली. देशाच्या कानाकोपन्यात शिवाजी महाराजांची जयगाथा घुमू लागली आणि हिंदवी स्वराज्य हे आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं. आज महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा आत्ममग्र होत नाही आहोत ना? हिंदू एकजुटीचा निर्धार कमी पडत नाहीये ना, हे पाहणं हेच महाराजांच्या कार्यास यथोचित अभिवादन ठरेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार हा हिंदू एकजुटीचा आहे आणि कायम राहील, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महारांजाच्या कार्याला उजाळा दिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: MNS President Raj Thackeray has write a special letter for Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.